सातारा प्रतिनिधी | आज सकाळ अगदी भल्या पहाटेपासून दुपारी एक वाजून 54 मिनिटापर्यंत घरगुती गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त असल्यामुळे घरोघरी मूर्ती प्रतिष्ठापनेची गर्दी गडबड दिसून आली. रिमझिम पावसाचा सरितच पहाटेपासूनच राजवाडा मोती चौक, नाका तसेच संगमनगर परिसरात मूर्ती वाजत गाजत घरी नेऊन भाविकांनी प्रतिष्ठापना केली.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात पूजा करून घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून 21 उकडीचा, तळलेल्या, कणकेच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. विविध महाआरत्या होऊन खिरापत वाटून झाल्यावर दुपारी गणेश भक्तांनी गणरायाला आवडणाऱ्या मोदकांचा स्वतः आस्वाद घेत या गणेशोत्सवाला आरंभ केला. सार्वजनिक गणेश मंडळाने दरवर्षी होणारी गणेश चतुर्थीच्या वाहतूक कोंडीची अवस्था लक्षात घेऊन यावर्षी 15 ऑगस्ट पासूनच मान्यवर गणेश मंडळांनी आपल्या प्रतिष्ठापना मिरवणुका काढण्यात आल्या. गणरायाच्या मूर्ती मंडपामध्ये दाखल केल्या होत्या. आज सकाळी फुटका तलाव गणेश मंडळाने नेहमीप्रमाणे तलावा मधील तरंग त्या तराफयावर गणेश मूर्ती स्थापना करण्यात आली.
तसेच शनिवार पेठ येथील इंग्लिश स्कूल चौकातील सोन्या मारुती मित्र मंडळ, जिल्हा परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, नाका येथील शिवाजी सर्कल गणेश मंडळ यांच्या गणपतीची ही सकाळी लवकर स्थापना करण्यात आली. सोमवार पेठेतील गजराज मंडळाची शेंदरी रंगातील बाल गणेश रुपातील देखणी भव्य मूर्ती आज राजवाडा परिसरातून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंडपात स्थापनेसाठी आणण्यात आली. तसेच मंगळवार पेठ येथील उमेश नारकर या कार्यकर्त्यांनी बनवलेल्या आकर्षक शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना मंगळवार तळी मित्र समूहाच्या वतीने मंडपात करण्यात आली.
यावर्षी गणेशोत्सव तब्बल ११ दिवस आहे येत्या मंगळवारी भाद्रपद सप्तमीला गणेशाच्या बहिणी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे आगमन होत असून बुधवारी नैवेद्य आणि गुरुवारी सायंकाळी या गौरीचा विसर्जन सोहळा होणार आहे आणि घरगुती गणपती विसर्जनही गौरीबरोबर होते. तसेच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन रविवारी सायंकाळी होणार आहे. यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी विसर्जन हौद तसेच निर्माण निर्माल्य कलश उभारण्यात आले आहेत.