निवडणुक आयोगाच्या पथकाकडुन दक्षिणेत वाहनांची तपासणी; ‘उत्तरे’त स्थिर पथके तैनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मंगळवारपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत. मतदार संघात येणाऱ्या वाहनांची तपासणी करून विनापरवाना ५० हजारांपेक्षा जास्त रोकड, मद्य, शस्त्रे वाहतूक किंवा इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. तर दक्षिण विधानसभा मतदार संघात देखील वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात १३ भरारी पथके आणि १२ स्थिर पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात उंडाळे- कोकरूड रोड, मालखेड फाटा व शेणोली घाट आदी ठिकाणी आचारसंहिता कालावधीपर्यंत २४ तास ही पथके तैनात राहणार आहेत.

नागरिकांनी निवडणूक आचार संहितेनुसार भरारी पथके व स्थिर पथके यांना आपल्या वाहनांची तपासणी करून देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित नागरिकांच्यावर निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल कायदेशीर गुन्हे दाखल केला जाणारा आहे.