कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाईसाठी विविध पथके देखील तैनात करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने वाहनांची तपासणी कारण्यासाठी स्थिर निगराणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून शामगांव घाटात नुकतीच वाहनांची तपासणी देखील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
स्थापन करण्यात आलेल्या पथकामध्ये पथक प्रमुख महादेव पाटील, सहाय्यक बी. आर. राऊत तसेच व्हिडीओ शुतुंगसाठी दीपक पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. निवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसापासून या पथकाच्याद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे.
या पथकाकडून कराडहून वडूज, दहिवडी, पुसेसावळी या मार्गाकडे जाणार्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचे शूटिंग आणि नोंद कर्नाय्त येत या आहार. संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली जात असून अवैध शस्त्रे, मद्य, रोख रक्कम आदींची वाहतूक करण्यात तर येत नाही ना? असे सांगत या पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. दि. ७ मे पर्यंत वाहनांच्या चोवीसतास तपासणीची मोहीम सुरु ठरवली जाणार आहे. यासाठी आठ-आठ तासांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत.