सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला कास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. या धरणाच्या उंचीची आणि पाइपलाईनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून युध्दपातळीवर काम सुरु असून या केंद्राच्या पथकाने काल कास येथे जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पथकातील महिला अधिकाऱ्यांना कास धरणाच्या कामाची माहिती दिली.
कास धरणाची उंची वाढवण्यात आली असली तरी वाढलेल्या उंचीप्रमाणे धरणात साठलेले पाणी हे खाली असलेल्या टाक्यांना तेवढ्या क्षमतेने येत नाही. त्यामुळे मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी आल्याने त्या कामास सुरुवात झाली आहे. याच कामाची पाहणी करण्यासाठी दिल्लीतून पथक येणार असल्याचा मेल पालिकेला पाठविण्यात आला. त्यानंतर
पथकातीळ महिला अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी पालिकेत मुख्याधिकारी बापट यांच्याकडून कास धरणातील कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी कास धरणाची वाढवलेली उंची व सुरु न असलेल्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली. तेथेही धरणाची पूर्वीची किती उंची होती. आता किती वाढलेली आहे. त्याचा फायदा सातारकरांना कसा होणार आहे, याची माहिती दिली गेली. दिवसभर हे पथक कास पठारावर पाहणी करत होते.