लोणंद मुक्कामात आरोग्य विभागाकडून 5 हजार 269 माऊलीच्या वारकऱ्यांची तपासणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात काल आगमन झाले. माऊलीच्या पादुकांचे नीरा स्नान केल्यानंतर पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला आहे. या ठिकाणी पालखीसोबत लाखो वारकरी थांबले आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एकूण 5 हजार 269 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहेत. यासाठी याठिकाणी 17 आरोग्य दूत पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच 21 आरोग्य पथके आणि प्रत्येक 1 कि.मी. वर एक रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आज करण्यात आलेल्या आयोग्य तपासणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पथकाने 286 वारकऱ्यांची तपासणी केली आहे. वैद्यकीय पथकाने 2 हजार 877, आरोग्य दुतांनी 452, आपला दवाखनामध्ये 41, 102 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 1 हजार 613 असे एकूण 5 हजार 269 वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीमध्ये विविध अजारांच्या 4 हजार 944 रुग्णांवर उपचार करण्यात आले. आरोग्य दुतांमार्फत वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच चालत असताना मार्गामध्येही तपासणी करण्यात येत आहे. तर आरोग्य पथकांमार्फतही पथक तैनाक करण्यात आलेल्या ठिकाणी तसेच 102 रुग्णवाहिकेच्या माध्मयातूनही वारकऱ्यांची तपासणी केली जात आहे. आरोग्य दुतांमार्फत दिंडी मधील वारकऱ्यांना तंबूमध्ये जाऊन आरोग्य माहिती पुस्तिका देण्यात आली. तसेच सर्व आरोग्य विषयी तक्रार असणाऱ्या माऊलींना औषध उपचार तर सकाळी सईबाई सोसायटी येथे सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम, योगासने, प्राणायाम व ध्यान सत्र घेण्यात आले.