हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MPSC आणि UPSC परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी सातारा येथील INSIGHT ACADEMY च्यावतीने शनिवार दि. 24 रोजी सकाळी 10.30 वाजता खास मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण अडसूळ हे ‘मुक्तसंवाद :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांचे बदलते स्वरूप स्पर्धेची तीव्रता आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी इनसाइट टॅलेंट सर्च परीक्षा घेतली जाणार असून यात उत्तीर्ण होणाऱ्यांना 5 लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
शनिवार, दि. 24 रोजी सातारा येथील माऊली ब्लड बँक हॉल पेंढारकर हॉस्पिटल च्या पाठीमागे पोवई नाका येथे मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य अरुण अडसूळ उपस्थित राहणार असून यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. त्यांच्या हस्ते INSIGHT ACADEMY च्या माध्यमातून यावर्षी विविध क्षेत्रात अधिकारी झालेल्या तरुण-तरुणींचा सत्कार केला जाणार आहे. गेल्या आठ वर्षापासून INSIGHT ACADEMY मधून 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलेले आहे.
परीक्षा देण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा…
https://play.google.com/store/apps/details?id=co.davos.gyrgz
यावर्षी सुद्धा भरघोस असे यश विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे. या विद्यार्थ्यांबरोबर तरांनीही मुक्तसंवाद या कार्यक्रमास पस्थित राहावे आणि इनसाइट टॅलेंट सर्च परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन लाखांची स्कॉलरशीप मिळवावी असे आवाहन इनसाइट एकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
‘या’ 32 विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
1.सुदर्शन कुंभार (Assistant Secretary Technical, MSBTE), 2. सुजीत भस्मे (Assistant Commandant), 3. पृथ्वीराज पाटील (Asst. Executive Engg.), 4. जग्गू सलाम (Asst. Engg.), 5. अक्षय पाटील (Asst. Engg.), 6. मीनाक्षी केसेकर (Asst. Engg.), 7. पल्लवी जोंधळे (Asst. Engg.), 8. अनंत उपाध्ये (Asst. Engg.), 9. दत्तात्रय शिर्के (AMVI RTO Inspector), 10. प्रियंका पाटील (Asst. Engg.), 11. चेतन शेंडे (Jr. Enng.), 12. सुप्रिया ननावरे (PSI & Skill Development Officer), 13. अंजली बर्गे (STI, ASO, उपशिक्षणाधिकारी), 14. ओंकार निकम (Jr. Engg. Indian Railway, RTO Inspector), 15. ऋषिकेश बाबर (Bank officers PO),16. प्रज्वल कणसे (Industry Inspector), 17. रणजीत शेजाळ (RTO Inspector), 18. सोनबा माळगे (Excies Sub Inspector), 19. स्वप्नील शिंदे (STI), 20. राजेंद्र शिंदे (STI), 21. विकी सोनवणे (STI), 22. आकाश कडव (PSI), 23. स्वप्नील माने (PSI), 24. प्रियंका पन्हाळकर (PSI), 25. अमर साळुंखे (PSI), 26. सूरज अनपट (PSI), 27. नीलिम जाधव (PSI), 28. ऋषिकेश देशमुख ( Jr. Clerk MHADA), 29. शिवानी क्षीरसागर (Clerk Bombay High Court), 30. अजिनाथ नाळे (Clerk Bombay High Court), 31. निखिल कदम (Forest guard), 32. प्रतीक जाधव (Air force Pilot (Recommended)) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणारा आहे.