सातारा प्रतिनिधी । परिवहन विभागाची वाहन सेवा व सारथी सेवा या नागरिकांना (अर्जदार) यांना ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामधील सारथी संगणक प्रणालीला वापरकर्त्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. काही कालावधीतच सारथी संगणकीय प्रणालीशी असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील व सारथी संगणक प्रणाली सुरळीतपणे चालू होईल, असे
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.
सारथी प्रणाली वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. संगणकावरील डेटाबेस फाईल मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झालेने सारथी संगणक प्रणालीला अडचणी येत आहेत. सदर बाबतीत राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र (NIC) यांच्याद्वारे अडचणी दूर करणेचे कामकाज चालू आहे. सदर कामकाजास संगणकावरील डेटाबेस फाईल साईज जास्त असल्याने कालावधी लागत आहे.
सारथी संगणकीय प्रणालीवरील तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील असे राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र (NIC) च्यावतीने माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही कालावधीतच सारथी संगणकीय प्रणालीशी असणा-या तांत्रिक अडचणी दूर होतील अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी सारथी वापरकर्त्यांना कळविले आहे.