इंदोली B Ed महाविद्यालयाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता उद्घाटन समारंभ उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | इंदोली, ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी एड महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील ‘यशवंत गट कराड’ या गटाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्र. 2 चा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. कापिल गोळेश्वर येथील जवाहर विद्या मंदिर विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास कडेपूर येथील आर्ट्स-कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र मोरे, प्राध्यापिका सौ. के. के. थोरात, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. पाटील, प्रा. सौ. के.के. थोरात, प्रा. सौ. बोर्डे यांच्यासह एस. एम. शाळेतील सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे म्हणाले की, प्रत्यक्ष शालेय सेवेत अध्यापक उत्तमरीत्या घडण्यासाठी आंतर वासितेचा टप्पा हा अतिशय मोलाचा ठरतो. विविध उपक्रमांच्या अनुभवाने अध्यापनासाठी परिपूर्ण आत्मविश्वास निर्माण होतो.

यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र मोरे यांनी एकूण कार्यक्रम सोहळ्याचे कौतुक केले. तसेच सर्व छात्राध्यापकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र बी एड महाविद्यालय इंदोलीच्या यशवंत गटाच्या मार्गदर्शक प्राध्यापिका सौ. के. के. थोरात यांनीही महत्त्वपूर्ण सूचना करून बहुमूल्य मार्गदर्शनही केले. त्यांनी या संस्थेचे, शाळा व्यवस्थापन समिती यांचे या उपक्रमासाठी सहकार्याबद्दल मनापासून सर्वांना धन्यवाद दिले.

शालेय आंतरवासिता टप्पा 2 यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. एस. एस .पाटील सर व प्रा.सौ. थोरात के.के.व प्रा.सौ. बोर्डे एस.एम.यांनी मौलिक मार्गदर्शन केले .तसेच नृसिंह शिक्षण संस्था इंदोलीचे चेअरमन मा. श्री निवासराव निकम (आप्पा) यांनीही प्रेरणा व शुभेच्छा देऊन उत्साह वाढविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्र मुख्याध्यापिका माधुरी वेताळ यांनी केले. सूत्रसंचालन संयोगिता देसाई व प्रियांका माळी यांनी केले. आभार प्रदर्शनाचे गोड काम मोनिका पाटील यांनी केले.