आगाशिव डोंगरावर विविध देशी रोपांची लागवड; अनेक वृक्षांची झालीय चांगली वाढ

0
107
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कृष्णा विश्व विद्यापीठाने वन विभागाच्या सहकार्याने ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत आगाशिव डोंगरावर गेल्या ७ वर्षांत हजारो रोपांची लागवड केली आहे. हा परिसर जैवविविधतेने संपन्न व्हावा, तसेच येत्या काळात आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

आगाशिव डोंगरावर कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे परिक्षेत्र वनअधिकारी संग्राम गोडसे आणि ललिता पाटील यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध देशी रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, कराड आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील, सेक्रेटरी राजेंद्र जाधव, खजानिस मोहन चव्हाण व अन्य पदाधिकारी, कृष्णा विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. शशिकिरण, डॉ. एन. आर. जाधव, राजेंद्र संदे, शशिकांत गायकवाड, शिवाजी पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भोसले पुढे म्हणाले, २०१८ साली उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्याला आता चांगले यश मिळताना दिसत आहे. अनेक वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. खरंतर डोंगरावर झाडे लावणे सोपे नाही. डोंगरावर पाणी आणणे, झाडांसाठी चांगली माती आणणे आणि रोपांची राखण करणे अशी अनेक आव्हाने आणि अडथळे पार करत, या झाडांचे संगोपन करण्यात आले. सध्या वन विभागाच्या ८ हेक्टर जागेत हा प्रकल्प राबविला जात आहे. वनविभागाने आणखी जागा उपलब्ध करुन दिल्यास, या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी परिक्षेत्र वनअधिकारी संग्राम गोडसे आणि ललिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना कौलगेकर यांनी प्रास्तविक केले.