सातारा प्रतिनिधी । भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 14 ते 23 ऑक्टोबर 2024 या कालावधीत SSB कोर्स क्र. 58 आयोजित करण्यात येत आहे, इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी दि. 7 ऑक्टोबर रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते.
या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास,भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB 58 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून यावेत.
कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC)अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी छात्रपूर्व, प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल [email protected] दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.