साताऱ्यात तापाच्या रुग्णात वाढ; ‘या’ भागात रुग्णांची संख्या जादा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये तापाचे रुग्ण काढले असून, ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान करताना सर्व टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. सदरबझार, शाहूपुरीसह सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थंडी, ताप याबरोबर अचानक येणाऱ्या तापाचे रुग्ण काढले आहेत.

सकाळी ताप नसला, तरी संध्याकाळी मात्र रुग्णांना दरदरून घाम फुटून ताप येत आहे. डेग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया अशा वेगवेगळ्या आजारांच्या टेस्ट, तसेच रक्ताच्या तपासण्या केल्या, तरी त्या निगेटिव्ह येत आहेत. असे असताना ताप येण्याचे नक्की कारण काय व याचे नेमके निदान होत नसल्याने रुग्ण धास्ताकले आहेत. सातारा शहरासह उपनगरांच्या खासगी, तसेच सरकारी ओपीडीमध्येसुद्धा अशा रुग्णांची गर्दी काढली आहे.

साताऱ्यात मान्सून सध्या अखेरच्या टप्प्यात असून, महाबळेश्वरसारख्या तालुक्यामध्ये पाच हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आधी ऊन, नंतर पाऊस अशा वातावरणामुळे प्रौढ नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. जिह्यामध्ये आठवडाभरात साडेचार हजार नागरिकांना तापाची लागण झाली होती. त्यातच सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.

परिसर अस्वच्छतेमुळे डेंग्यूसारख्या आजारांमध्येसुद्धा वाढ झाली. परतीचा पाऊस आणि अधूनमधून चटके देणारे ऊन असे वातावरण जिह्यात आहे. हा वातावरणातील बदल मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. या वातावरणामुळे वयोवृद्धांसह लहान बालके आजारी पडत आहेत. त्यामुळेच जिल्हा रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा गर्दी आहे.