कराड प्रतिनिधी । जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर (Bapusaheb Maharaj Dehukar) यांचे मार्गदर्शनाखाली संतकृपा वारकरी सेवक संघ महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालयाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी रिसवड येथे होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष दिपक महाराज दाभाडे व संस्थापक सचिव आकांक्षाताई सातारकर यांनी दिली.
या कार्यक्रमास जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर, श्रीगुरु ह.भ.प.सोहम महाराज देहूकर, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, विधान परिषदेचे आमदार अमितदादा गोरखे, भजनसम्राट ह.भ.प. किरण भोसले, पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष मृदंगसम्राट मदन कदम, जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मण पाटील किरोली, मृदंगसम्राट केशव कुंभार येतगाव, सुनिल दळवी, पै. सतीश इंगवले, ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था विहापूरचे अध्यक्ष गणेश महाराज डांगे, माजी पंचायत समिती सदस्य सुनीलरव पाटील, वाघेश्वरचे सरपंच धीरज जाधव, मुंबईचे उद्योगपती अशोकराव पवार, ऍड. रितेश सुतार, प्रशांत साळुंखे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात संतकृपा वारकरी जीवनगौरव पुरस्कार २०२४ दिले जाणार आहेत. यामध्ये वारकरी भूषण पुरस्कार भजनसम्राट ह.भ.प. किरण भोसले, मृदंगसाधक पुरस्कार ह.भ.प. केशव महाराज कुंभार येतगाव, उत्कृष्ट तबलावादक पुरस्कार अनिकेत इंगळे कांबिरवाडी, निष्ठावंत वारकरी पुरस्कार ह.भ.प. सुभाष महाराज अडागळे तर मरणोत्तर निष्ठावंत वारकरी पुरस्कार वै. ह.भ.प. अक्काताई लोहार यांना मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहेत.
या दिवशी सकाळी ७.४५ वा. सत्यनारायण पूजा, स. ९ वा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रजप, स.१० ते १ भजन मैफिल, दु.१ वा. ब्रह्मलीन सद्गुरु श्री.सेवागिरी महाराज पाटण ते पुसेगाव पायी पालखी दिंडी सोहळा आगमन, दु.१.३० ते २.३० जगद्गुरु तुकोबारायांचे १० वे वंशज ह.भ.प श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा, दु. २.३० ते ५ वा. उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा. उद्घाटक ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर, सायंकाळी 5 वा. पसायदान होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.दिपक तडाखे करणार आहेत. कार्यक्रमास सर्व वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. दिपक महाराज दाभाडे, विश्वस्त सचिन दाभाडे व संस्थापक सहसचिव ह.भ.प. आबा पवार यांनी केले आहे.