खासदार शरद पवारांच्या हस्ते कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे झाले थाटात उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आपल्या भाषणात खासदार शरद पवार यांनी “कराड तालुक्यातील काले नावच गाव हे स्वातंत्र्याच्या चळवळीमधील संघर्ष करणार स्वातंत्र सैनिकांचं गाव म्हणून ओळख जात. हा सर्व परिसर याबाबतीत इतिहासाचा भाग झाला आहे. कालेसह परिसरातील गावातील स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी उभे राहिले आहे”, असे प्रतिपादन पवार यांनी केले.

यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी उपस्थित आहेत. तसेच कार्यक्रमास माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, शशिकांत शिंदे, सारंग पाटील तसेच अन्य मान्यवर आणि समस्थ ग्रामस्थ यांनी देखील उपस्थिती लावली आहे.

यावेळी खा. पवार म्हणाले की, आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतरचा १३७ वा स्वागताचा दिवस आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करावे यासाठी एक व्रत घेतलेल काम अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. अण्णांसमोर काही व्यक्ती आदर्श होत्या त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि प्राकृतिक विचाराचा पुरस्कार करण्याचं काम अण्णांनी जीवन रेषा म्हणून स्वीकारली होते. या कामात यश यायचं असेल तर मुलं शिकली पाहिजेत, त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत, साधन मिळाली पाहिजेत ही भूमिका त्यांनी अंतकरणापासून स्वीकारले. त्याची सुरुवात कुठून करावी यासाठी काले या गावाचा उल्लेख करावा लागेल. हे गाव स्वातंत्र्याच्या चळवळीत संघर्ष करणारं स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. हा सगळा परिसर हा इतिहासाचा भाग झाला. या गावातील ५७ लोकांनी स्वातंत्र्य सैनिकाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि त्या संघर्षात सहभागी झाले.

लोकांमध्ये जागृती करणे सत्यशोधकी विचार सांगणार तो लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. त्यात संदर्भात शांताराम काकडे आणि या गावचे सुपुत्र कै. इस्माईल मुल्ला या दोघांची आठवण या ठिकाणी करून देणे आवश्यक आहे. मुल्ला साहेबांनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण काळ हा अण्णांचे सहकारी म्हणून झोकून दिला. अशाच या प्रयत्नातूनच काळेगाव येथे विद्यालय सुरू व्हावं अशी मागणी त्यांनी अण्णांकडे केली होती. अण्णांनी ती मागणी पूर्ण केली त्यातून या विद्यालयाचा जन्म झाला.

महात्मा गांधी या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे नेते होते. गांधीजींचे वैशिष्ट्य होतं की इंग्रज गेले पाहिजे पण नुसतं इंग्रज जाऊन चालणार नाही तर लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी विधायक कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. तू कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्मवीर अण्णा गांधीजींच्या विचाराचे प्रेरक होते. अण्णांनी हा निकाल घेतला की महात्मा गांधींच्या नावाने मी अनेक विद्यालय काढली हा त्यांचा निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शाखा महात्मा गांधीजींच्या नावाने काढल्या. शाखेच्या मालिकेमध्ये काल्याची शाखा सुद्धा आवश्यक येते. ही शाखा महात्मा गांधींच्या नावाने सुरू करण्याचा निकाल हा त्यांनी १९७८ साली घेतला. आजपर्यंत ही शाळा उत्तम प्रकारे काम करते आहे.

आज या ठिकाणी शाळेची इमारत बांधण्यासाठी गावच्या लोकांनी पुढाकार घेतला याचा आनंद आहे. अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम गोळा केली याचा आनंद आहे. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून इतर गोष्टींची असलेली आवश्यकता पूर्ण करण्याचे काम आम्ही केले. यामधून आज ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी विद्यार्थी अनेक दृष्टीने पुढे यशस्वी होतील अशा पद्धतीने तयार झाले पाहिजे. हे पिढी तयार करण्यासाठी इतर उपक्रम हाती घेतली पाहिजे, असे खा. पवार यांनी म्हंटले.

यावेळी सुरुवातीला कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या समितीतर्फे खासदार शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे- पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले की, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आक्टोबर १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच संस्थेचे पहिले वसतिगृहही काले येथेच सुरू केले. तर १ ऑगस्ट १९४८ रोजी महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना करण्यात आली. 2023 मध्ये या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

काले येथील शाळेच्या नूतन इमारतीसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सुमारे १ कोटी रुपयांचा निधी शरद पवार यांनी दिला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेकडून ५५ लाख, सदुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्याकडून २० लाख, रयत शिक्षण संस्थेचे व महात्मा गांधी विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, रयत सेवक, शिक्षक, हितचिंतक व शालेय बाल गोपाळांनी दिलेले आपल्या वाढदिवसाचे व खाऊचे पैसे असे मिळून सुमारे ७२ लाखाचा निधी शाळेच्या इमारतीसाठी दिला आहे. तसेच या सर्व निधीतून सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची भव्य-दिव्य अशी शाळेची इमारत उभारण्यात आली असून त्या शाळा माऊलीचा उद्घाटन समारंभ पार पडले आहे.