सातारा प्रतिनिधी | उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने संविधान मंदिराच्या मंचाचे उद्घाटनाचा कार्यक्रम वाईच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑनलाइन स्वरूपात आभासी पद्धतीने उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
संविधानाची उद्देशिका, संविधानविषयक विविध पुस्तके व कलाकृती आकर्षकपणे एका मंचावर स्थापन करून त्यास संविधान मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. वाईतील संविधान मंचाचे अनावरण व उद्घाटन तहसीलदार सोनाली मेटकरी, सामाजिक कार्यकर्ते विजय सातपुते यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी ॲड. विजय जमदाडे, ॲड. भागवत, वाई सहकारी सूतगिरणीचे मॅनेजिंग डायरेक्टर कोरे, द्रविड हायस्कूलचे प्रा. सुधीर शिंदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
वाई आयटीआयमध्ये संविधानविषयक संकल्पनेवर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा शा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यास प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात आले.
संविधान मंदिर उपक्रमाची संकल्पना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली व आयटीआय वाईने या उपक्रमास उत्स्फूर्त व व सक्रिय सहभाग दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे प्राचार्य मिलिंद उपाध्ये व कर्मचारी निलेश गायकवाड, रमेश चव्हाण, नीता पिसाळ, संपत वंजारी, स्वप्निल सांगळे, सीमा जम्बुरे, दत्तात्रय पवार, सुनील गाढवे, डी. वाय. पवार, अविष्कार पोळ यांनी परिश्रम घेतले.