सातारा प्रतिनिधी । राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे सातारा येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ज्या ज्या विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्या विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिल्या.
राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हा प्रशासन अधिकारी नगर प्रशासन पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण विभागाने या महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील या दृष्टीने नियोजन करावे. त्याचबरोबर शालेयस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने होर्डीगवर फ्लेक्स लावून महोत्सवाची प्रसिद्धी करावी. सर्व तहसीलदारांनी कार्यक्रमाचे व्यवस्थीत नियोजन करावे, अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.