सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात लाखो ग्राहकांकडून वीज वितरणच्या विजेचा वापर हा केला जातोय. मात्र, त्यांच्याकडून विजेचा वापर केला जात असताना त्याचे बिल कधीमधी थकवले जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून दंडात्मकसह थेट वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई केली जात आहे. सातारा जिल्ह्यात दिवाळीत मोठ्या प्रमाणात वीज वापरून ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणाची जिल्ह्यातील वीजबिलाची थकबाकी २७ कोटींवर गेली आहे. याचा परिणाम म्हणून वीज वितरण कंपनीने एक महिन्याचे बिल थकले तरी वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.
सातारा जिल्ह्यात औद्योगिक, घरगुती किंवा वाणिज्य संस्था तसेच घरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा वापर हा केला जातो. नुकताच दिवाळी सण येऊन गेला. या सणात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी विजेचा माफ प्रकारे वापर हा केला. सातारा जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ग्राहकांची संख्या असून त्यांनी वापरलेल्या विजेनंतर वीजबिलच भरलेले नाही. त्यामुळे वीज महावितरणची तब्बल २७ कोटींची वीजबिलांची थकबाकी आता करण्याचे मोठे आव्हान वीज महावितरनपुढे आले आहे.
वास्तविक पाहता महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हा आहे. वीजखरेदीसाठी दरमहा महसुलामधील सुमारे ८० टक्के रक्कम खर्च होतो. त्यानंतर दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा खर्च वीजबिलातून मिळालेल्या महसुलावरच अवलंबून आहे. मात्र, इतर खर्चांमुळे नागरिकांचे चालू महिन्याचे वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे थकबाकीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणची कोंडी झाली आहे. त्यासाठी एक महिन्याचे बिल थकले असले, तरी किती रक्कम आहे, हे न पाहता वीज तोडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
असे भरा आजचा आपलया थकीत वीजबिलाची रक्कम
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करता येतो. याव्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.