कराड प्रतिनिधी | तांबवे, ता. कराड येथील गावचे सुपुत्र सुरेश राजाराम फिरंगे यांच्या कडून अनेक समाजोपयोगी कार्य केले जाते. त्यांनी नुकतेच आपल्या मातोश्री स्व. कै. लक्ष्मीबाई राजाराम फिरंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित स्वा.सै. आण्णा बाळा पाटील विद्यालय तांबवे या शाळेमध्ये गरीब मुलांना गणवेशाचे वाटप केले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन निवासराव रामचंद्र पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही.पोळ, माजी मुख्याध्यापक एच.पी. पवार, सुरेश फिरंगे, आदीसह सर्व शिक्षक- शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश फिरंगे यांनी आपल्या आईचे पुण्यस्मरण वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यावर्षी आईचे वर्ष श्राद्ध साध्या पद्धतीने करून त्यासाठी येणारा खर्च हा अनाथ मुलांना गणवेश वाटप करून करण्याचे ठरवले. मग त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पैशातून गोर-गरीब मुलांसाठी गणवेश खरेदी केले. त्यांनी गावातील शाळेत जाऊन त्या गणवेशाचे वाटप केले. त्यांनी गणवेश वाटपाचा घेतलेला निर्णय आणि राबविलेल्या उपक्रमाचे तांबवेसह परिसरातील गावातील ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.