सातारा प्रतिनिधी | दोन अस्वलांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील कात्रेवाडी हद्दीत ही घटना घडली आहे. संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८) आणि शंकर दादू जानकर (रा. जुंगटी, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत.
जुंगटी तालुका जावली येथील संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८ )व शंकर दादू जानकर (वय ५२) यांच्यावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अस्वलांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
कास पठारच्या दुर्गम भागात असलेल्या सातारा तालुक्यातील जुंगटी येथील संतोष लक्ष्मण कोकरे वय ४८ व शंकर दादू जानकर वय ५२ यांच्यावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रेवाडी हद्दीत जंगलातून जात असताना दोन अस्वलांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संतोष कोकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या चवताळलेल्या अस्वलाने कोकरे यांच्या शरीराचे मोठे मोठे लचके तोडले आहेत तर शंकर जानकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे असून अस्वलानी हल्ला केल्याने कास परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सातारा तालुक्यातील जुंगटी येथील शंकर दादू जानकर व संतोष लक्ष्मण कोकरे हे सकाळी साडेअकराच्या सुमारास जुंगटी वरून कारगाव येथे आपल्या आत्याकडे पाहुणे निघाले होते. जंगलातून चालत असताना कात्रेवाडीच्या हद्दीत आल्यानंतर दोन अस्वलांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. जानकर यांनी हल्ल्याचा प्रतिकार करायला सुरुवात केल्यानंतर एक अस्वल जंगलात पळून गेले मात्र दुसऱ्या अस्वलाने संतोष कोकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला व त्यांना खाली पाडून त्यांच्या डोक्याला मांडीला हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले
या अस्वलाला टोकाचा प्रतिकार करत हुसकावून लावून या दोघांनी नातेवाईकांशी संपर्क केला कास पठार कार्यकारी समितीच्या कर्मचाऱ्यांनी जखमीना समितीच्या वाहनातून सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत दरम्यान कास पठार विभागातील गावातील नागरिकांना वन्य प्राण्यापासून भीती निर्माण झाली आहे वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.