दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विसापूर (ता. खटाव) येथे दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिका संगीता अंकुश शिंदे (वय ४८, गादेवाडी) यांचा संगीता शिंद मृत्यू झाला. खटाव तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश गणपत शिंदे यांच्या त्या पत्नी होत.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे गुरुवार (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुसेगाववरून मूळ गाव असणाऱ्या गादेवाडीकडे निघाल्या होत्या. दरम्यान औंध-फलटण राज्य महामार्गावरील विसापूर हद्दीत त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. संगीता अंकुश शिंदे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधावलेवाडी (विसापूर) येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

जिल्हा परिषदेचा २०१९-२० चा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला होता.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक ये प्रभारी मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. पुसेगाव पोलिस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे.