जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपेंना निलंबित करा; इम्रान मुल्लांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करुन खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, सामाजिक कार्यकर्त्या विद्या मोरे उपस्थित होत्या. मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड येथील राजेश शिंदे व डॉ. पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत कराड वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून संबंधित डॉ. राजेश शिंदे व डॉ. पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात आढळलेल्या त्रुटी तसेच बॉम्बे नर्सिंग अॅक्टच्या मान्यतेखाली राजेरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

परंतु डॉ. करपे यांनी कोणतीही शहानिशा न करता अथवा जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून त्याठिकाणी पडताळणी करुन कोणतीही चौकशी न करता पुन्हा डॉ. राजेश शिंदे यांना मान्यता दिली. याबाबत आरोग्य मंत्री तसेच पालकमंत्री यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे निलंबित करावे. तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे.