रंगपंचमी दिवशी सातारा जिल्ह्यात ड्राय-डे घोषित करावा; इम्रान मुल्ला यांची पोलीस अधीक्षकांना निवेदनाव्दारे मागणी

0
196
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सर्व धर्मीयांचा आवडता असा रंगपंचमी हा धार्मिक उत्साह बुधवारदि. १९ रोजी साजरा केला जाणार आहे. या उत्सवाला काही समाजकंटकांकडून गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी सातारा जिल्ह्यात ड्राय-डे घोषित करावा, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वंयरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी केली.

मुल्ला यांनी आपल्या विविध मागण्याचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्यासह कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयास दिले आहे. मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १९ रोजी सातारा जिल्ह्यात ड्राय-डे घोषित करण्या पाठीमागील कारणे सांगायची झाल्यास हा रंगपंचमीचा उत्सव हा सर्वधर्मीय उत्साहात साजरा करीत असतात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील वातावरण दूषित झालेले असल्याने व या धार्मिक उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयास सातारा जिल्ह्यात ड्राय-डेचा आदेश पारित करण्यात यावा.

रंगपंचमीच्या दिवशी काही समाजकंटक मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करीत असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. जर आपल्याकडून ड्राय डे घोषित करण्यात आला तर सर्वसामान्य नागरिकांना या उत्सवाचा आनंद लुटता येईल व शांततेच्या मार्गाने आनंदाच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यास मदत होईल, अशी मागणी जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे केली आहे.