कराड प्रतिनिधी । कराड नगरपरिषदमध्ये अजब कारभार सुरू आहे. कराड नगर परिषदेमध्ये महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यालय हलवून लेखापरीक्षण अभियंत्यांनी त्यांचे नवीन कार्यालय स्थापन करावयास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांनी त्या ऑफिसच्या कामासाठी कोणाकडून पैसे घेतले? कोणत्या ठेकेदारांनी त्यांना अर्थसहाय्य केले?,याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वंयरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुल्ला यांनी आपल्या विविध मागण्याचे निवेदन नगरविकास मंत्री, विभागीय आयुक्त नगरविकास, जिल्हा प्रशासह सहाय्यकी आयुक्त यांच्याकडे दिलेले आहे. मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व सामान्य जनता उद्योगधंदे चालवून कर स्वरूपात नगरपालिकला महसूल देत आहे. त्या महसुलाच्या जीवावर नगरपालिकेचे मुख्यालखा परीक्षण अधिकारी मजा मारत आहेत. एक वर्षापूर्वी सुमारे लाखो रुपये खर्च करून स्वतःसाठी केबिन निर्मिती केली. आजपर्यंत कराडच्या इतिहासामध्ये कोणताही मुख्यालेखा परीक्षण अधिकारी केबिनमध्य बसला नव्हता.
आता तर त्यांनी कहरच केला असून महिला व समाज बालकल्याण विभाग कराड शहराचे कार्यालय हलवून स्वतःचे नवीन कार्यालय स्थापन करावयास सुरुवात केली आहे. या कामाकरता पुन्हा एकदा लाखो रुपये खर्च करून या शहरातील नागरिकांचा पैसा पाण्यासारखा ओतून स्वतःची हाऊस भागवून घेत आहेत. या पैशाचा हिशेब कोण विचारणार? कराड शहराच्या पैशावर मजा मारणारे हे अभियंते यांच्यावर नियंत्रण कोण ठेवणार? असा सवाल मुल्ला यांनी केला आहे.