टक्कल पडू लागलंय? पाण्यातील ‘या’ गोष्टीचा होतोय जास्त परिणाम

0
137

सातारा प्रतिनिधी । आपल्या शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पाणीपुरवठा करत असताना शुद्धीकरणावर विशेष भर दिला जातो. मात्र, शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. त्यापैकीच एक केस गळतीने अनेकांची चिंता वाढवली आहे. पाण्यामध्ये खनिजांचे प्रमाण अधिक असेल तर केस गळून टक्कल पडण्याचा धोका असतो.सातारा जिल्ह्यात देखील अनेक जणांची केस गळतीची समस्या आहे. त्यावर संबंधित मोठं मोठ्या स्पेशालिस्टडॉक्टरांकडून देखील उपचार घेत आहेत. मात्र, केस गळतीच्या समस्येला प्रामुख्याने पाण्यातील काही घटक जबाबदार आहेत.

आपल्या केसांच्या आरोग्यावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. बदलती जीवनशैली, आनुवंशिकता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी शरीरावर व केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. कमी वयाच्या पुरुषांमध्ये तसेच काही स्त्रियांमध्ये केसगळती होऊन टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे. कारण स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार करता येतो. त्यामागे त्वचारोगाशी निगडित कारणेसुद्धा असू शकतात. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन गरजेचे आहे.

केसगळतीने डोक्याला ताप

पुरुष असो वा स्त्रियांचे केसामुळे सौंदर्य वाढते अन्यथा चेहरा विचित्र वाटतो. हल्ली केसगळतीचे प्रमाण युवा-युवतींमध्येही वाढले आहे. केसवाढीसाठी औषधोपचार केले जातात. शेवटचा पर्याय म्हणून विग (कृत्रिम) केस लावले जातात. मात्र, नैसर्गिक केस व कृत्रिम केस यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात फरक पडतो. केसगळती मनस्तापही वाढतो.

अंघोळीसाठी कुठले पाणी वापराल?

-कमी टीडीएस असलेले पाणी अंघोळीसाठी वापरणे योग्य आहे.

-फिल्टर केलेले पाणीसुद्धा वापरता येईल.

-जास्त गरम पाणी वापरण्यापेक्षा कोमट पाण्याचा वापर करावा.

पाण्यातील या घटकांमुळे केसगळती

बोअरच्या पाण्यात खनिजांचे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम, आयर्न, सल्फेट आणि क्लोराइडचे प्रमाण अधिक असते. या घटकांमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊन केस गळती होते. पाणी शुद्धतेसाठी वापरलेल्या घटकांचे कमी-अधिक प्रमाण कारणीभूत.

पाण्यात टीडीएस किती असावा?

पिण्यासाठी पाण्यातील टीडीएसची पातळी ५० ते १५० पीपीएम असावी लागते, तर आंघोळीसाठी २०० पीपीएमपेक्षा कमी पातळी असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here