अजितदादा गटाचे रामराजे तुतारी हातात घेणार? म्हणाले, वेळ पडली तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | “आपली भारतीय जनता पार्टीबरोबर भांडणं नाहीत. आपण हिंदूत्व-मुसलमान करत नाहीत. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक जर नाही पडला, तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही”, असा थेट इशाराच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी देत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोमवारी फलटण येथे येणार असून त्यांच्या स्वागताच्या आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज फलटणमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी रामराजे म्हणाले की, महायुतीचा असलेल्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे नेते सहकार्य करत नसतील तर पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालू, नाहीतर तुतारी वाजवू.

गल्लोगल्ली दहशत करणाऱ्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे. त्यांना भाजपने साथ देऊ नये. एवढीच आमची इच्छा आहे, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले.