सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाबळेश्वर व तापोळा परिसरातील जलजीवन मिशनच्या कामांची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटवकह्या सूचना देखील केल्या. जलजीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्याने राज्यात चांगले काम केले आहे. दुष्काळी भागासह दुर्गम भागात या योजनेमुळे नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. दुर्गम भागातील कामे करण्यात अडचणी येत असल्या तरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन ही कामे गतीने करा, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केल्या.
यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांत्रिकी विभागाचे उपअभियंता जे. बी. लाडे, उपअभियंता मेटकरी आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी प्रतापगड येथे नव्याने करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना, कुंभरोली येथे नव्याने तयार करण्यात आलेला विहीर, वाणवली तर्फ आटेगाव येथील पाणी साठवणीचा मेटॅलिक टैंक येथेही भेट दिली. त्यानंतर तापोळा येथील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात ही आदी आलेली पाण्याची टाकी, फिल्टर, नळ जोडण्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, करण्यात प्राथमिक शाळा, पार येथील योजना, शिवकालीन पूल, महाबळेश्वर करण्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या – तर्फ तापोळा येथील बार्जची अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी केली.
महाबळेश्वर, तापोळा परिसरातील दुर्गम गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत पाणी योजनांना प्राधान्य देण्यात आले असले तरी ही कामे आणखी गतीने करावीत. प्रतिकूल परिस्थितीत कामे करताना अडचणी आहेत. मात्र नागरिकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्यावे, अशा सुचनाही नागराजन यांनी केल्या. यावेळी कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी जलजीवन मिशनच्या कामांची माहिती दिली.