आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डूडी यांच्या बोगस डॉक्टर विरोधात महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने यंत्रसामुग्री खरदीचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. हे डॉक्टर शोधण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशा महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, नागरिकांना आरोग्यविषयक आणखीन चांगल्या सेवा द्या. तसेच ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या महिलांच्या प्रसुतींची संख्या वाढवावी. सध्या जिल्ह्यात चांगला डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध समाज माध्यमे, शाळा, महाविद्यालय तसेच ग्रामीण भागात जनजागृती करावी. यामध्ये उद्योगांचेही सहकार्य घ्यावे.

यावेळी डूडी यांनी महत्वाच्या सुचना देखील केल्या. ते म्हणाले की, बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. हे डॉक्टर शोधण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. ज्या तालुक्यात बोगस डॉक्टर आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात यावा. बोगस डॉक्टर आढळून आल्यास दवाखाना तात्काळ सील करावा. पोलीस विभागाने तपास करुन कठोर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत सांगितले.