कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील विविध धारण, तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर नद्यांची पाणी पातळीही वाढू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 57.45 अब्ज घन फूट पाणीसाठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 38.59 टक्के इतका असल्याची माहिती कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाणी साठ्याबाबत उपकार्यकारी अभियंता म्हणाले की, जिल्ह्यातील धरणांमधील मोठे प्रकल्पातील कोयना धरणात – 35.62 (35.38 %), धोममध्ये – 4.57 (39.09), धोम – बलकवडीमध्ये 3.07 (77.53), कण्हेर धरणात – 3.29 (34.31), उरमोडी धरणात – 4.04 (41.87), तारळी प्रकल्पात 4.02 (38.77). तर मध्यम प्रकल्पातील येरळवाडी येथे – 0.0038 (0.55), नेरमध्ये – 0.084 (20.19), राणंदमध्ये – 0.017 (7.48), आंधळी धरणात– 0.021 (8.02), नागेवाडीत – 0.056 (26.67), मोरणा धरणात – 0.878 (67.54), उत्तरमांड नदीत – 0.28 (32.56), महू धरणात – 0.793 (72.75), हातगेघर प्रकल्पात – 0.0606 (24.24), वांग (मराठवाडी) धरणात – 0.647 (23.77) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 84 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 4 मि.मी., धोम – बलकवडी – 20, कण्हेर – 13, उरमोडी – 15, तारळी – 20, येरळवाडी – 5, उत्तरमांड – 12, महू – 15, हातगेघर – 15, वांग (मराठवाडी) – 13 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.