कराडकरांनो पाणी पिताना सावधान; दूषित पाणी पुरवठ्याबाबत पालिकेनं केलं महत्वाचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाली असून पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली असली तरी नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून शहरातील नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये दूषित पाणी मिसळून साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण करून प्रक्रिया करणे आकश्यक असते. दरम्यान, कराडला कृष्णा आणि कोयना नदीतून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुरवठा केला जातोय. मात्र, पावसाळ्यात दूषित आणि गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांनी पाणी उकळून पिणे आवश्यक आहे.

पालिकेच्या निवेदनात काय म्हंटलं आहे?

कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी मंगळावरी कराड शहरातील नागरिकांसाठी एक आवाहन करणारे निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हंटले आहे की, कराड शहरातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, सध्या पावसाचे दिवस आहेत. तसेच, पावसामुळे कोयना नदीस गढुळ पाणी येत आहे. नगरपरिषद, स्वच्छ व निर्जतुक पाणी पुरवठा करणेची कार्यवाही करत आहे. तथापी, कराड शरातील सर्व नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने काळजी म्हणुन कराड नगरपरिषदे तर्फे आवाहन करणेत येते की, पिण्याचे पाणी गाळूण व उकळून पिण्यास वापरावे. तसेच, पाण्याचा वापर काटकसरीने करावा. व नगरपरिषदेस सहकार्य करावे. ही विनंती, असे आवाहन मुख्याधिकारी खंदारे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

सात टाक्यांची साठवण क्षमता साठवण क्षमता लिटरमध्ये

१) मार्केट यार्ड : २० लाख
२) टाऊन हॉल : १५ लाख
३) रविवार पेठ : १५ लाख
४) सोमवार पेठ : ७ लाख
५) रुक्मिणीनगर : २० लाख
६) सूर्यवंशी मळा : १५ लाख
७) गजानन सोसायटी : ६.५० लाख

पालिकेच्या नोंदीनुसार सुमारे पाणी पुरवठ्याबाबत महत्वाचे

वितरण नलिकांची लांबी : ५४ किमी
दलघलित पाणी आरक्षण परवाना : ६.५७
कहाडची लोकसंख्या : ९८,१९८
रोजचा पाणीपुरवठा : १४.०६ दशलक्ष लिटर
एकूण नळ कनेक्शन : ११,१०४
दरडोई दरदिवशी पाणी पुरवठा : १४९ लिटर

दूषित पाणी प्यायल्याने कोणकोणते आजार होतात?

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य सांभाळा असा सल्लाही डॉक्टर वारंवार देतात. अनेक भागांत पुराच्या पाण्यामुळे किंवा पाणीगळतीमुळे दूषित किंवा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. अशावेळी पावसाळ्यात पाणी केव्हाही उकळून पिणेच चांगले असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

कावीळ अन् अमिबियासिसचा धोका

दूषित पाण्यामुळे हिपॅटायटीस ए आणि ई असे जीवघेणे आजारही होऊ शकतात. त्याचबरोबर अमिबियासीसचा धोकाही संभवतो. मळमळ, अतिसार, अनपेक्षित वजन कमी होणे, पोटदुखी, ताप अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

हे’ गंभीर आजार जीवावर बेततील

  • दूषित पाण्यामुळे कॉलरा, डायलिया तसेच जुलाब झाल्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते.
  • गॅस्ट्रो , लेप्टोपायरेसिस, पोलियो, विषमज्वर असे गंभीर आजारांनाही तोंडतों द्यावे लागू शकते.
  • सगळ्यात गंभीर आजार म्हणजे अमिबीयासीसचाही सामना करावा लागू शकतो.
  • त्यामुळे परिसरात गढूळ किंवा दूषित पाणी येत असेल तर तातडीने विभागातील पालिका अधिकाऱ्याच्या ते निदर्शनास आणून द्यायला हवे.
  • त्याचबरोबर पाणी उकळूनच प्यायला हवे.
  • हल्ली पाणी शुद्ध करणाऱ्या मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो; परंतु पाणी उकळल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरतात आणि पाणी सुरक्षित होते,

आजारात काय काळजी घ्यावी?

  • दूषित पाण्यामुळे अतिसार किंवा जुलाब असा त्रास जाणवल्यास अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यासह आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
  • अशा रुग्णांनी हलका किंवा द्रवस्वरुपातील आहार घ्यावा.
  • अशा आजारांत तोंडाची चवच निघून जाते. त्यामुळे भाज्यांचे सूप, भाताची पेज, वरणावरील पाणी असा आहार फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे, संत्री आणि मोसंबीचे सेवनही उत्तम आहे.