सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील 118 गावांमध्ये रास्त भाव दुकान सुरू करण्याबाबतचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या गावांमध्ये रास्त भाव दुकानांसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
प्राधान्यक्रमाने सातारा तालुक्यातील 14 गावे, शहरी भागासाठी 1, वाई तालुक्यातील 19 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 47, कोरेगाव तालुक्यातील 12, खटाव तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 3 व माण तालुक्यातील 4 अशा एकूण 118 गावांत रास्त भाव दुकान सुरू करण्यात येणार आहेत.
इच्छुकांनी रास्त भाव दुकानांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन राजमाने यांनी केले असून ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरिता संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडे 31 जुलैपूर्वी अर्ज करावा, असे राजमाने यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.