कराड प्रतिनिधी । वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ हा पर्यावरण आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे वन्यजीवांचा छळ केल्यास किंवा बंदिस्त ठेवल्यास या कायद्यान्वये तो गुन्हा ठरतो. मात्र, काही जणांकडून ‘ट्रेंडिंग’मध्ये येण्यासाठी तसेच ‘लाइक्स’ आणि ‘शेअर्स’ वाढविण्यासाठी ‘हटके’ रील बनविण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण त्यासाठी वन्यप्राण्यांच्या रील्स बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारित करतात. मात्र, कायद्याने तो गुन्हा आहे. याप्रसंगी कोठडीही होऊ शकते. तसेच पोपट किंवा अन्य वन्य पक्षी, प्राण्यांबाबत खाऊ घालण्याचा व्हिडीओ शेअर केलात तरी शिक्षा होऊ शकते. मात्र, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अशी कारवाई झालीच नसल्याचे दिसून आले आहे.
अनेक प्राण्यांच्या प्रजातींचा ऱ्हास होऊ लागल्याने पर्यावरण धोक्यात आल्याने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असा हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कायदा करण्यात एका असून तो अधिक कडक करण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन कर्णच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार हे नक्की!
कायद्याबाबत जागृती करण्याची गरज : रोहन भाटे
वन्यप्राण्यांच्या रील बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारित करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, अनेकांना याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे काही वेळा असे प्रकार घडतात. वन विभागाने याबाबत जागृती करण्याची गरज आहे. ज्या प्राणी, पक्षांचा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मध्ये समावेश होतो, अशा प्राणी, पक्षासोबत रीळ बनवणे, व्हिडिओ काढलयास कारवाई नक्कीच केली जाऊ शकते, अशी माहिती कराड येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
खाऊ घाला मात्र, जीवास धोका झाल्यास कारवाई नक्की
वास्तविक सांगायचे झाले तर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार पशुपक्ष्यांना खाऊ घालणे, हा गुन्हा आहे. त्यामुळे काही वेळा त्या अन्नातून विषबाधा किंवा त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्या जीवास धोका निर्माण झाल्यास कारवाई देखील होऊ शकते.
वन्यजीवाशी खेळू नका
वन्यजीवांना डांबून ठेवणे, त्यांच्याकडून मनोरंजनासाठी विविध खेळ करून घेणे, त्यांच्या शरीराला त्रास देणे मारहाण करणे, हा या कायद्यान्वये गुन्हा आहे. काही व्यक्ती वन्यजीवांची नखे, त्वचा किंवा इतर अवयवांची तस्करी करतात. हाही देखील कायद्यानुसार गुन्हा आहे.
नेमका काय आहे वन्यजीव कायदा?
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ हा भारतीय संसदेत मंजूर झालेला कायदा आहे. पर्यावरण रक्षणासाठी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी, वनस्पती आणि प्राणी प्रजातीच्या संरक्षणासाठी हा कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे या कायदा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी, वन्यप्राण्यांचे जतन करण्यासाठी अंमलात आणला जात आहे.
असे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर टाळा
वन्यप्राण्यांकडून विविध खेळ करून घेत असलेले, त्यांना शारीरिक ब्रास देणारे, त्यांना खाऊ घालणारे, त्यांना पकडून ठेवलेले, मारहाण करणारे असे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास तो गुन्हा असून, त्याबद्दल कोठडीही होऊ शकते.
तर दंड आणि कारावास…
वन्यजीव अभयारण्यात कलम २८, राष्ट्रीय उद्यानात कलम ३५ (८), संरक्षित क्षेत्रात आणि कम्युनिटी रिझर्व्ह या परिक्षेत्रात असा गुन्हा घडल्यास १९७२ च्या कायद्यानुसार तीन वर्षे कारावास किंवा २५ हजारांपर्यंत दंड अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतो.