सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील वाहन मालिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, वाहन मालिकांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी 531 रुपये ते 879 रुपये पर्यंत शुल्क द्यावे लागेल, ज्यामध्ये जीएसटी व स्नैप लॉकची किंमत समाविष्ट आहे.
महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना 31 मार्च 2025 पूर्वी HSRP बसविणे अनिवार्य केले आहे. हे नियम वाहन चोरी रोखणे व वाहनांची ओळख पटविण्यास मदतील आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे नियुक्त कंपन्या तालुक्याच्या ठिकाणी फिटमेंट सेंटर सुरु करण्यात आली आहेत, ज्यामुळे वाहन मालिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
वाहन मालिकांना महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वेबसाईटवर (https://transport.maharashtra.gov.in) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. तसेच, नजीकच्या कंपनीचे फिटमेंट सेंटरवर अपॉईमेंट घेऊन ही सुविधा घेता येईल. वाहन प्रकार निहाय HSRP शुल्क असे आहे: टु व्हिर्लस व ट्रॅक्टर्ससाठी रु. 531/-, थ्री व्हिर्लससाठी रु. 590/-, आणि लाईट मोटार व्हेईक्ल्स/पॅसेंजर कार/मेडियम कर्मशिअल व्हेईक्ल्स/हेवी कर्मशिअल व्हेईक्ल्स आणि ट्रेलर/कॉम्बिनेशनसाठी रु. 879/. या शुल्कात 18% जीएसटी समाविष्ट आहे.
HSRP नंबर प्लेटमध्ये होलोग्राम, लेसरब्रांडेड ID नंबर, व रिअसेंबल न होणारे स्नैप लॉक असतात. यामुळे वाहन चोरी रोखणे व वाहनांची ओळख पटविणे सोपे होते. हे नंबर प्लेट छेडछाड-प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देखील हे महत्त्वाचे आहे.
सातारा आणि फलटण कार्यालयातील जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी कोळकी येथील समर्थ ऑफसेट, अजित नगर, फलटण – शिंगणापूर रोड, कोळकी येथे फिटमेंट सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या सुविधा केंद्रांवर जाऊन वाहन मालिकांना या अनिवार्य नियमाची पालना करणे सोपे होईल.