सातारा प्रतिनिधी । सातारा, शिरवळ व पुसेगांव याठिकाणी अवैध देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यांवर पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली आहे. तिघा जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १३ लाख ३० हजार ७१५ रुपये किंमतीचा प्रोव्हीबिशन मुद्देमाल जप्त केला आहे.
१) अमोल शंकर नलवडे (वय ३४, रा. वेळे ता वाई जि सातारा), २) राजेंद्र शंकरराव जावळे (वय ५५, रा पुसेगाव ता खटाव जि सातारा), ३) अविनाश अरविंद साळुंखे (वय ३९ , रा नागठाने ता जि सातारा) अशी अटक केलेल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विधानसभा निवडणुक प्रकिया २०२४ अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात आचारसंहिता लागु असल्याने श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये अवैध शस्त्र व दारु विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत.
पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत शिरवळ, सातारा, व पुसेगांव याठिकाणी अवैध दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी यांच्या अधिपत्त्याखाली वेगवेगळी ३ तपास पथके तयार करुन त्यांना मिळाले माहिती प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
श्री अरुण देवकर यांनी रवाना केलेल्या पथकांनी शिरवळ, सातारा व पुसेगांव याठिकाणी जावून मिळाले माहिती प्रमाणे सापळा लावून तीन वाहने देशी-विदेशी दारुची वाहतुक करीत असताना पकडुन त्यांच्या ताब्यातुन १,८०,७१५/- रुपये किंमतीची देशी-विदेशी दारु व ११,५०,०००/- रुपये किंमतीची वाहने असा एकुण १३,३०,७१५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांच्या विरुध्द शिरवळ, सातारा शहर, व पुसेगांव पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल केलेले आहेत.
सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, हसन तडवी, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम, गणेश कापरे, विशाल पवार, रविराज वर्णक, सचिन ससाणे यांनी सहभाग घेतला.
विधानसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ चे आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अवैध दारु विक्री, वाहतुकीच्या एकुण १६ केसेस करुन १६,३८,८१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.