सातारा जिल्ह्यात झालेत आठजण आमदार; ‘इतका’ असतो पगार अन् ‘या’ मिळतात सुविधा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीतील माजी आमदारांसह अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांचा पराभव करून आठ जण आमदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडून आलेल्या आमदारांना किती पगार मिळतो? त्यांना किती पगार मिळतो? याबद्दल अनेकदा अनेकांना प्रश्न पडतो? या निवडून आलेल्या आमदारांच्या पगार आणि इतर भत्ते जोडले तर एका आमदाराला महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये रक्कम मिळते. शिवाय एकदा निवडून आलं आणि ५ वर्ष काम केलं तरी आयुष्यभरासाठी पेन्शनही सुरू होते.

आमदार हे विधिमंडळ, विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये काम करतात. त्यांना शासनाच्या नियमानुसार पगार, भत्ता, सुविधा, सवलती मिळतात. आमदारांना काही सुविधांसाठी भत्ता दिला जातो. त्यानुसार टेलिफोन खर्चासाठी 8 हजार रुपये, स्टेशनरीसाठी 10 हजार रुपये, कॉम्प्युटर 10 हजार रुपये भत्ता दिला जातो.

सातारा जिल्ह्यात ‘हे’ झाले आहेत विद्यमान आमदार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल नुकताच लागला. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात महायुतीचे आठ उमेदवार विजयी झाले. यामध्ये महायुतीतून एकनाथ शिंदे गटातील पाटणचे आ.शंभूराज देसाई व कोरेगावचे आ. महेश शिंदे तर भाजपमधील साताऱ्यातून आ. शिवेंद्रराजे भोसले, कराड उत्तरमधून आ. मनोज घोरपडे, कराड दक्षिणमधून आ.अतुल भोसले, माण खटावमधून आ. जयकुमार गोरे आणि अजित पवार गटातून फलटणमधून सचिन पाटील आणि वाईमधून आ. मकरंद पाटील हे विद्यमान म्हणून आमदार झाले आहेत.

दर दिवशी काही विशिष्ट रक्कम

यासोबत अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला दर दिवशी काही विशिष्ट रक्कम भत्त्याच्या स्वरुपात दिली जाते. यानुसार प्रत्येक आमदाराला प्रति दिनी 2 हजार रुपये भत्ता मिळतो. आमदारांसोबत असलेल्या पीएंनादेखील 25 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.

राज्यांतर्गत प्रवासासाठी 15 हजार रुपये भत्ता

आमदारांना राज्यांतर्गत प्रवासासाठीदेखील भत्ता दिला जातो. याअंतर्गत आमदारांना दर वर्षाला 15 हजार रुपये मिळतात. एखाद्या आमदाराला महाराष्ट्राबाहेर जायचे असल्यास त्यासाठी सुविधा असते. याअंतर्गत आमदारांना स्वतंत्र 15 हजार रुपये दिले जातात.

मोफत प्रवास

आमदार विमानतळाहून राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात.आमदारांना बेस्ट, एमएसआरटीसी आणि एमटीडीसीमध्ये मोफत प्रवास करता योतो.

निवृत्ती वेतन किती?

आमदारांना पगारासोबत त्यांच्या निवृत्तीचीही खास सुविधा शासनाकडून केली जाते. आमदाराचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याला निवृत्ती वेतन मिळते. तसेच कार्यकाळ सुरु असताना आमदाराचे निधन झाले असल्यास निवृत्ती वेतन त्याच्या कुटुंबाला दिले जाते. माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. एखादा आमदार एकाहून अधिक टर्म आमदार म्हणून कार्यकाळ करत असेल तर टर्मप्रमाणे त्यांच्या निवृत्ती वेतनात 2 हजार रुपये वाढतात.

मुख्यमंत्र्यांना मिळतो ‘इतका’ पगार

महाराष्ट्रातील आमदारांना जेवढा पगार मिळतो. त्यापेक्षा जास्त हा मुख्यमंत्र्यांना मिळत असतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ३.४ लाख रुपये पगार मिळतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत.