सातारा अन् बारामतीची निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीत २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर काल शनिवारी मतमोजणी करण्यात आली. त्यात भाजप-शिंदे-अजितदादा महायुतीला मोठा विजय मिळाला. यंदाच्या निवडणुकीत साताऱ्याचा ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील उमेदवार म्हणून यंदा दोन मतदारसंघांमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि आपला अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच, पवार विरूद्ध पवार अशी चर्चेतील लढत असलेल्या बारामतीतूनही ते उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि साताऱ्यात अभिजित बिचुकलेना फक्त ५२९ मते मिळाली.

साताऱ्यात अभिजीत बिचुकले सहाव्या क्रमांकावर सातारा मतदारसंघात भाजपाच्या तिकीटावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी तब्बल १,४२,१२४ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. त्यांची लढत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांच्याविरोधात होती. शिवेंद्रराजे यांना एकूण १,७६,८४९ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या अमित कदम यांना ३४,७२५ मतांवर समाधान मानावे लागले.

बारामती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती. सलग ७ वेळा या मतदारसंघातून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे त्यांना आव्हान होते. पण निकालात दिसल्याप्रमाणे अजित पवारांनी विजय मिळावला आहे. अभिजित बिचुकले यांना फक्त 94 मते मिळाली. बारामती जागेसाठी नोटासह एकूण 24 उमेदवार रिंगणात होते.