सातारा प्रतिनिधी । लोकसभा आणि विधानसभेच्या 2014 तसेच 2019 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण 31 दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. त्यातील अ फायनल-2, क फायनल- 2, अबेट फायनल- 1, निर्दोष, -15, शाबित- 6, कोर्ट पेडिंग- 2, आरोपी निष्पन्न- 90. या सर्व गुन्ह्यांमधील 84 आरोपींवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच त्याकाळात 5 अदखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. त्यातील निष्पन्न आरोपी 7 आहेत. सातही आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण 45 दखलपात्र गुन्हे नोंद झाले होते. त्यातील अ फायनल-1, निर्दोष -8, शाबित- 16, गुन्हे काढून टाकले- 13, कोर्ट पेडिंग- 5, आरोपी निष्पन्न- 100. या सर्व गुन्ह्यांमधील 89 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. नोंद झालेल्या अदखलपात्र 11 गुन्ह्यांतील निष्पन्न आरोपी 17 आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 मध्ये एकूण 39 दखलपात्र गुन्हे दाखल होते. त्यातील अ फायनल-3, ब फायनल-1, क फायनल- 1, निर्दोष – 8, शाबित- 4, काढून टाकले- 5, कोर्ट पेडिंग- 17, आरोपी निष्पन्न- 71,. या सर्व गुन्ह्यांमधील 68 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. अदखलपात्र २ गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या दोन्ही आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 मध्ये एकूण 32 दखलपात्र गुन्हे असून त्यातील अ फायनल-3, अबेट फायनल- 1, एन सी फायनल- 1, निर्दोष – 13, शाबित- 5, काढून टाकले- 5, कोर्ट पेडिंग- 4, आरोपी निष्पन्न- 45, पोलिसांनी त्या सर्वांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. याशिवाय अदखलपात्र गुन्हे 18 असून यातील निष्पन्न आरोपी 27 आहेत. त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.