साताऱ्यात मिळवला शिवेंद्रराजे भोसलेंनी विजय; दोन्ही मिशा पिरळत विजयानंतर दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी केवळ सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणूक एकतर्फी होती. या ठिकाणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याठिकाणी मोठी आघाडी घेत नुकताच विजय मिळवला आहे. निवडणुकीत त्यांना 1 लाख 76 हजार 849 इतकी मते पडली. त्यांनी विरोधात असलेल्या शिवसेनेचे (उबाठा) अमित कदम यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव केला आहे. दरम्यान, विजयानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यानी त्यांची विजयी मिरवून देखील काढली. गुलालात माखलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी विजयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महायुती पुन्हा एकदा सत्तेत येत आहे. भाजप पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने पुन्हा एकदा निवडून दिले आहे. आत्ताची आकडेवारी बघितली तर संपूर्ण पवतीपुस्तक मतदार बांधवांनी माझ्या हातामध्ये दिल्यासारखे मला वाटले आहे. मतदार बांधवांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो पुढील पाच वर्षात मी विकास कामाच्या माध्यमातून दाखवून देईन, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी संगितले.

साताऱ्यात विजयी मिरवणूक काढल्यानंतर भाजप महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास आखवला तो मी सार्थ केला आहे. मी माझ्या मतदार संघातील मतदार बांधवांचे जाहीर आभार मानत आहे.

दरम्यान, महायुती भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 1 लाख 42 हजार 830 मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 1 लाख 76 हजार 849 मते पडली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांना
34 हजार 725 मते मिळाली आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून पुन्हा उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. तर शिवेंद्रराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने अमित कदम यांचा पराभव झाला आहे. आधीच शिवेंद्रराजेंचा एकहाती दबदबा, त्यात उदयनराजेंची साथ यांचा करिश्मा या ठिकाणी पहायला मिळाला आहे.