सातारा प्रतिनिधी | इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची माहिती उघड केली आहे. 1971 मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे ही वाघनखे खरी नसून सातारा राजघराण्याकडे ही वाघनखे आहेत आणि ते घराणे कधीतरी स्पष्टीकरण देतील. शेवटी, उदयनराजे यांनीच आता पुढे येऊन याची माहिती द्यावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
इंद्रजित सावंत यांनी सांगितले नुकताच माध्यमांशी संवाद साधत वाघनखांबाबत महत्वाची माहिती दिली आहे. की, 1971 मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे ही वाघनखे खरी नाहित. त्यामुळे सरकारने जनतेची दिशाभूल करू नये.
राज्य सरकारने लंडनमधील वाघनखं परत आणण्याचा दावा केला होता. मात्र म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत
लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नका. हे वाघनखे छत्रपती शिवरायांची नसल्याचे लिहणे बंधनकारक केले असताना, राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असे सावंत यांनी म्हटले आहे.
पत्रव्यवहारातून खरी माहिती समोर…
लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आहेत, याबाबत अनिश्चितता आहे. असं पत्र व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियमनं दिलं आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतानी म्युझियमसोबत केलेल्या पत्रव्यवहारातून ही माहिती समोर आली आहे.