सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये दरवर्षी हजारो पक्षी येतात. यामध्ये खासकरून हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी ‘पट्टेरी हंस’ या पक्ष्याची संख्या जास्त पहायला मिळते. यंदाच्या वर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून खटाव तालुक्यातील मायणी समूह पक्षी संवर्धन असलेल्या येरळवाडी येथील तलावामध्ये दाखल झाला आहे. हा ‘पट्टेरी हंस’ जगातील सर्वात जास्त उंच उडणाऱ्या पक्षांमधील एक पक्षी असून तशी त्याची नोंद आहे. या पट्टेरी हंसाचे येरळवाडी येथील तलावात आगमन झाले आहे.
येरळवाडी येथील तलावात फ्लेमिंगो पक्षी देखील या ठिकाणी हजेरी लावत आहेत. मायणी समूह पक्षी संवर्धन असलेल्या मायणी, सुर्याचीवाडी, कानकात्रे येथील तलावातही हे पक्षी हजेरी लावतील यात शंका नाही. पट्टेरी हंस (बार-हेड हंस) याचे दक्षिण आशियातील पर्वतीय तलावात वास्तव्य असते. तो भारतात थंडीची चाहूल लागल्यानंतर स्थलांतरित करतो आणि मध्य आशियात प्रजनन करतो अगदी दक्षिणेकडील दक्षिण भारतापर्यंत. हे घरट्यात एकावेळी तीन ते आठ अंडी देतात. हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून त्याला ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे.
पट्टेरी हंस(बार-हेड हंस) हिमालय पर्वतावर दक्षिण आशियाच्या काही भागात (आसाम ते तमिळनाडूच्या दक्षिणेस दक्षिण भागात) हिवाळा घालवण्यासाठी स्थलांतर करतात.हे पक्षी मुख्यत्वे तिबेट पठारावर घरटी करतात. हा पक्षी प्रेमळ आहे आणि इतर पक्ष्यांना त्रास देत नाही. या आठवड्यात थंडी चाहूल सुरू झाल्याने हे पट्टेरी हंस येरळवाडी तलावात दाखल झाले असून पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मायणी पक्षी आश्रयस्थानाला मिळाला ‘हा’ दर्जा
खटाव तालुक्यातील मायणी पक्षी आश्रयस्थानाला “मायणी समूह पक्षी संवर्धनाचा” दर्जा दिला आहे. यामध्ये मायणी, येरळवाडी,कानकात्रे येथील तलाव व वनक्षेत्राचा समावेश केला आहे. या भागात प्रतिवर्षी स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यामुळे पक्षी प्रेमींना वेगवेगळे पक्षी पाण्याचा आनंद होत असतो. येत्या नजीकच्या काळात मायणी समूह पक्षी संवर्धनाचा विकास होऊन पर्यटन क्षेत्र होण्यास मदत होणार आहे. हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून ‘पट्टेरी हंस’ला ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे हा पट्टेरी राजहंस आपले खाद्य तलावाकडील असलेल्या गवतामध्ये शोधतात.