सातारा प्रतिनिधी । लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांच्या जामीन प्रकारणी आज मुंबई हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरता 5 लाखांची लाच घेतल्याचा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्यायाधीशानी हायकोर्टात दिलेली आव्हान याचिका फेटाळण्यात आली. न्यायाधीशांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची एसीबीकडे तक्रार आली होती. न्यायाधीश निकम यांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टाकडून ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. याबाबत आज हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिलेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यात एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र संशयीत आरोपी ते देण्यास असमर्थ असल्याने त्याने हा सर्व प्रकार लाच लुचपत विभागाला देत रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरुन पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे कारवाई केली आणि साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीशांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. अशातच हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टाने ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने देखी आता झटका दिला आहे. तसेच न्यायाधीशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले असून किशोर खरात हे मुंबई पोलीस खात्यात वरळी येथे ते कार्यरत आहेत. तर न्यायाधीश धनंजय निकम यांची पाच लाखांची लाच घेण्याच्या प्रक्रियेत किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. तर धनंजय निकमसह चौघांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने या आधीच फेटाळला होता.




