कराड शहरातील शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्रीला मोठा प्रतिसाद, पहा कुठे आहे हॅलो कृषी आउटलेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : कराड शहरात शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री करणाऱ्या हॅलो कृषी आउटलेटला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट आंबे हॅलो कृषी आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने अगदी योग्य दरात ओरिजिनल हापूस आंबा मिळत असल्याने यातून हॅलो कृषी च्या शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो आहे.

शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री करणारे हॅलो कृषी आउटलेट कुठे आहे?

कराड शहरात स्टेशन रोडवरील कॉटेज हॉस्पिटल समोर हॅलो कृषीचे आउटलेट आहे. कॉटेज हॉस्पिटलच्या बरोबर समोर, सारस्वत बँकेच्या शेजारी, साई नेत्रसेवाच्या बाजूला शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री करणारे हॅलो कृषी आउटलेट सुरु आहे. रोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत हॅलो कृषी आऊटलेट सुरु असते. खात्रीशीर हापूस आंबा योग्य दरात मिळत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने येथून आंबे खरेदी करत आहेत.
Hello Krushi Outlet Mob No – 7588193185

२ लाख शेतकरी हॅलो कृषी सोबत जोडलेले

हॅलो कृषी महाराष्ट्रभरातील एकूण २ लाखाहून अधिक शेतकऱ्यांसोबत जोडले गेलेले असून बियाण्याच्या निवडीपासून मार्केटपर्यंत हॅलो कृषी आपल्या शेतकऱ्यांना मदत करते. शेतीविषयक सर्व माहिती, कृषी सल्ला, हवामान सल्ला आदी माहिती हॅलो कृषी आपल्या शेतकऱ्यांना देऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करते.

९० हजार एकर शेतजमीन हॅलो कृषीवर रजिस्टर

हॅलो कृषी अँपवर एकूण ९० हजार एकरहुन अधिक शेतजमीन नोंदवली गेली आहे. या जमिनीवर पिकणारा शेतमाल थेट शेतकऱ्याच्या वावरातून ग्राहकाच्या दारात पोहोच केला जातो. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा शेतमाल, फळे, भाजी तर मिळतेच पण यातून शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळतो आहे.