नवजात पावसाची जोरदार बॅटींग; 24 तासात ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. मात्र, पश्चिम भागात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे गेल्या चोवीस तासात तब्बल 130 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नवजासह कोयनानगर आणि महाबळेश्वरमधील दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे.

संपुर्ण सातारा जिल्ह्यात दमदार पावसाला अद्याप सुरूवात झाल्याचे दिसत नाही. परंतु, घाट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. कोयना धरणाचा परिसर हा सह्याद्रिच्या डोंगररांगानी समृध्द आहे. डोंगर आणि घाट क्षेत्रामुळे पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून पाणीसाठाही वाढत आहे.

पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ

गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. ही बाब निश्चितच सुखावणारी आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर, पाण्याची सुरू झालेली आवक आणि पाणीसाठ्यातील वाढ ही कोयना प्रकल्पासाठी दिलासादायक आहे. दमदार पावसाबरोबरच पाणीसाठ्यात वाढ होणे महत्वाचे आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असला तरी पुर्वेकडे परिस्थिती गंभीर आहे.

पायथा वीजगृहातील विसर्ग बंद

पुर्वेकडील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात येत होते. तथापि, धरणातील पाण्याच्या नियोजनासाठी तसेच आवर्तनाची मागणी नसल्यामुळे धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठा वाढत जाईल. सध्या धरणात 13.63 टीएमसी पाणीसाठा झाला असून प्रतिसेकंद 9,737 क्युसेक पाण्याची धरणात आवक होत आहे.