सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा पावसाची कालपासून न थांबता पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज दिवसातील 9 तासात 3. 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने रौद्र रुप धारण केल्यामुळे वनविभागाने ओझर्डे धबधबा पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील काडोली ते संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी 5 34. 3 टीएमसी पाणीसाठा होता. सकाळच्या सुमारास धरणात 31. 10 टीएमसी साठा होता. धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. आज सकाळपासून म्हणजेच गेल्या 9 तासात कोयनेला- 165 मिलीमीटर पाऊस पडला. कोयना परिसरातील ओढे, नाले भरुन वाहत आहेत. येव्हडच नव्हे तर धुवाधार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यामध्येही मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
पाटण तालुक्यातील मोरगिरी भागातील वाडीकोतावडे गावाला जोडणारा जुना फरशी पूल पाण्याखाली गेला आहे. मोरणा परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक दुकानात तसेच बसस्थानकात पाणी शिरले आहे. एकूणच या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाटण व्यतिरिक्त वाई, कराड, सातारा, महाबळेश्वर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Koyna Dam
Date: 19/07/2023
Time: 05:00 PM
Water level: 2083′ 10″ (635.152m)
Dam Storage:
Gross: 34.03 TMC ( 32.33%)
Inflow: 66159 cusecs
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 165/1472
Navaja: 111/2075
Mahabaleshwar: 153/2051