कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकी संदर्भात ११ मार्च अखेर एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नसून निवडणूक उमेदवारी अर्ज छाननीमध्ये २०५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, यातील १० उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, शिवाजीनगर यांचे समोर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध कलम १५२(अ) अन्वये अपील दाखल केले आहेत. त्यावर आज दि. १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता सुनावणी सुरू केली जाणार आहे.
पुण्यात होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहून म्हणणे दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या सर्व उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सदर अपिलबाबत नोटीस व अपील मेमो निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयात सूचना फलकावर लावण्यात आले आहेत. सदर सुनावणीची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सुनावणीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
अवैध अर्ज ठरलेल्या उमेदवाराची नावे
१. बाबुराव जगन्नाथ पवार, बेलवडे- हवेली (गट क्रमांक २-तळबीड)
२. दिलीप हनुमंत कुंभार, तळबीड (इतर मागास वर्ग राखीव)
३. सिंधुताई दादासो जाधव, पाडळी- हेळगाव (महिला राखीव)
४. जयश्री पृथ्वीराज पाटील, सुपने (महिला राखीव)
५. अधीकराव पांडुरंग माळी, सुपने (इतर मागास वर्ग राखीव)
६. संदीप यशवंत पाटील, उत्तर तांबवे (गट क्रमांक १-कराड)
७. श्रीकांत माधवराव जाधव, गोवारे ( गट क्रमांक ४-कोपर्डे हवेली)
८. प्रतापराव गणपतराव यादव, कडेपूर- कडेगाव (गट क्रमांक १-कराड)
९. मानसिंगराव वसंतराव जगदाळे, मसूर (गट क्रमांक ५-मसूर)
१०. निवास आत्माराम थोरात, नडसी( गट क्रमांक ४-कोपर्डे हवेली)