भारताला अभिमान वाटावे असेच काम करणार – हणमंतराव गायकवाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | काही मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या भारत विकास ग्रुप या संस्थेचे काम आज वृद्धिंगत होताना सातारा जिल्ह्यामध्ये आज नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला. आज शंभर जॉब प्रोफाइल तयार आहेत. तसेच 16 देश आपल्या देशाकडून कर्मचाऱ्यांची अपेक्षा करत आहेत आणि हे काम भारत विकास ग्रुपच्या कडून करण्याचे काम मी सुरू ठेवले आहे. आज जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आणि देशाला अभिमान वाटावा असेच काम करत राहणार, असे गौरव उद्गार भारत विकास ग्रुपचे प्रमुख संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी काढले.

सातारा येथील गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने सन २०२३ या वर्षाचा सातारा भूषण पुरस्‍कार बी. व्‍ही. जी. ग्रुपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना श्री समर्थ सेवा मंडळाच्या समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे वितरित करण्‍यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख संघटक डॉ. अनिल पाटील, तसेच जेष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.राजेंद्र शेंडे,अशोक गोडबोले, डॉ.अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा भूषण पुरस्काराचे प्रसंगी गायकवाड बोलत होते.

यावेळी पुरस्काराचे हे ३३ वे वर्ष असून त्‍यांचे कार्याचा विचार करून ३३ वा सातारा भूषण हा २०२३ चा पुरस्‍कार देण्‍यासाठी त्‍यांचे नाव ट्रस्‍टचे विश्‍वस्‍त अरूण गोडबोले, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर व आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निश्‍चीत केले. रूपये ३० हजार व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी प्रास्ताविक भाषणांमध्ये ट्रस्टचे विश्वस्त अच्युत गोडबोले यांनी भाऊ काका गोडबोले यांनी स्वतः हलाखीच्या परिस्थितीत गरिबीतून दिवस काढल्यावर समाजातील गोर गरीब मुलांना अपेक्षित असणारे शैक्षणिक मदत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील ठेवले त्यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत आम्ही तिन्ही भावांनी हा ट्रस्ट स्थापन करून आज त्याचा फंड कोटीच्या वर गेला यावर्षी नुकतीच साडेपाच लाख रुपयांची मदत विविध मुला-मुलींना तसेच संस्थांना केली अरुण गोडबोले यांनी या ट्रस्टला व्यापक स्वरूप दिले 1991 सातारा भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.