कराडच्या हातगाडाधारक व्यावसायिकांनी घेतली पृथ्वीराजबाबांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथे गेल्या अनेक दिवसांपासून काही स्थानिक युवकांकडून प्रीतिसंगम घाट परिसरात हातगाड्याद्वारे व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. हप्ते मागणे, युवतींची छेड काढणे, व्यावसायिकांना दमदाटी करणे आदी प्रकार केले जात असल्याने याविरोधात कारवाई करण्याची मागणी संबंधित व्यवसायिकांकडून केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने येथील हातगाडे व्यावसायिकांनी आज माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पृथ्वीराजबाबांनी पोलिसांशी चर्चा करत त्यांना तात्काळ संबंधित युवकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, आज नांदेड येथील अंकुश सौरते या व्यक्तीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक धमकीचा इमेल केला. याप्रकरणी नांदेडमध्ये त्याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हि गंभीर गोष्ट घडली असताना आज कराड येथील पाटण कॉलनीतील आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी कराड शहरातील प्रीतिसंगम घाटावरील हातगाडे व्यावसायिकांनी त्यांची भेट घेतली. तसेच प्रीतिसंगम घाट परिसरात काही युवकांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.

यावेळी व्यावसायिकांनी शिवीगाळ केली जात असल्याची गोष्ट पृथ्वीराजबाबांच्या कानावर घातली. यावेळी पृथ्वीराजबाबांनी त्यांना धमकी आली असताना देखील घराबाहेर येत नागरिक, व्यवसायिकांसोबत चर्चा केली. त्यांनी माहिती करून घेतल्यानंतर थेट कराडच्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावून बोलवून घेतले. नागरिक, व्यावसायिकांसमोरच पोलिसांन या प्रकरणी तात्काळ संबंधित धमकी देणाऱ्या, हप्त्याची मागणी करणाऱ्या युवकांवर करवाई करावी, अशा सूचना दिल्या. यावेळी व्यावसायिकांनी व नागरिकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले.