हिला डाला ना…! गुणरत्न सदावर्तेचा NCP ला दणका; या निवडणुकीत घालवली तब्बल 25 वर्षांची सत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : एसटी कामगारांचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त विधानं आणि कृतींमुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. सदावर्ते यांनी सातारा येथे राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात जबरदस्त धक्का दिला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला आहे. सदावर्ते यांनी राष्ट्रवादीची 25 वर्षांची सत्ता एका झटक्यात घालवली आहे.

साताऱ्यातील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. मागील 25 वर्षांपासून सत्तेत असणा-या एसटी कामगार संघटनेचा गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने 19-0 ने पराभव केला.

एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांनी आपल्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. 23 जूनला राज्यभरातील 281 मतदान केंद्रावर ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुक पार पडली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने विजय मिळवला. स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 7 पॅनलचे 150 उमेदवार निवडणुक लढवत होते.

मुंबईतील स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक संचालक मंडळ निवडणुकी सदावर्ते यांच्यासह गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष संघटनेने देखील ही निवडणुक लढवली. सदावर्ते, पडळकर संघटनेत रस्सीखेच सुरू होती. या निवडणुकीत खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनेल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये होती. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सदावर्ते यांनी राष्ट्रवादीला झटका दिला आहे.