कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये भाजप पदाधिकारी अभिषेक भोसले यांच्या संयोजनाने नुकतेच व्यापारी संमेलन पार पडले.
कराड येथील जैन मंदिराच्या सामाजिक हॉलमध्ये आयोजित व्यापारी संमेलनास कराड दक्षिण तालुका अध्यक्ष धनंजय पाटील, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, भाजप महिला मोर्चा प्रदेश कार्यकरणी सदस्य स्वाती पिसाळ, माजी नगरसेवक घनशाम पेंढारकर, सुहास जगताप, उमेश शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजप पदाधिकारी अभिषेक भोसले यांनी व्यापारी संमेलनास उपस्थित व्यापाऱ्यांना प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेसह विविध योजनांची विस्तृत स्वरूपात माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या व्यापार संदर्भातील योजनेतील महत्वाचे घटक, निकष यावर मार्गदर्शन केले.
यावेळी व्यापारी संमेलनास कराड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बाबुभाई लुनिया, श्री कांतीलाल भंडारी, प्रवीण भोसले, अजित सांडगे, विकी वाघमारे, तेजस फुटाणे, प्रतिक कांबळे, रविराज शिंदे, सुरज जाधव, अक्षय जाधव, वैभव थोरवडे, संदीप थोरवडे, अक्षय शहा, प्रितेश शहा, सत्यम मोदी, तानाजी देशमुख आणि इतर व्यावसायिक, महिला उद्योजक वैशाली भोसले, कविता माने, सविता माने आदींसह असंख्य व्यापारी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
दरम्यान, कार्यक्रमास भाजपचे रमेश मोहिते, मुकुंद चरेगावकर, प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, रपेंद्र कदम, दिलीप जाधव, नितीन वास्के, समाधान चव्हाण, ऋषिकेश मूटेकर, शैलेंद्र गोंदकर, विनायक घेवदे, विवेक भोसले, कृष्णा चौगुले, रवी भोसले, प्रमोद शिंदे, सुहास चक्के, धनंजय माने, नितीन शाह आदींनी उपस्थिती लावली होती.