कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी संघटना, आम्ही कालेकर ग्रुप यांचेवतीने ‘जमीन कायदे ज्ञानपीठ’ या विषयावर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यावतीने मागर्दर्शन करण्यात आले.
यावेळी ॲड. प्रविण भांगे, प्राचार्य तथा कृषी शात्रज्ञ श्री. चंद्रकांत साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय कुंभार होते. यावेळी के. एन. देसाई, कांतीलाल शेटे, चंद्रकांत कुंभार, विकास पाटील, सौरभ कुलकर्णी, बाजीराव पाटील, निशिकांत पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजय कुंडेटकर यांनी 7/12, खरेदी दस्त, फेरफार, मृत्युपत्र इ गोष्टींवर मार्गदर्शन व ग्रामस्थांच्या शंकानिरसन केले. डॉ. संजय कुंभार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन सुरु करावी तसेच गावोगावी वॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करावेत. महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी आपला सेवाभाव असाच सुरु ठेवून समाजाची सेवा करावी. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. एम. गायकवाड, रमेश कुलकर्णी, जयसिंगराव साळुंखे, सेवानिवृत्त अधिकारी श्री. मोहन डोळ, कर्मचारी यांनी प्रयत्न केले.