जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची झाली बदली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांच्या विभागवार बदल्या केल्या जाय आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या पाच ठिकाणी तालुक्यात गटविकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे त्यामध्ये माण, कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे, कोरेगावचे गटविकास अधिकारी किशोर माने यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे ‘रोहयो’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांची शिरोळ (कोल्हापूर) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांची पालघरच्या जलजीवन मिशन प्रकल्प संचालकपदी तसेच खटावचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांची हातकणंगले गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. खटाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नव्याने वैभव सापळे, खंडाळा गटविकास अधिकारीपदी शबाना बेगम मोकाशी, कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी सुप्रिया चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.