कराड प्रतिनिधी । विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ती पहिली शेतकरी आत्महत्या असल्याचे मानले जाते. यानंतर गेल्या ३८ वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर एकदिवसीय अन्नत्याग उपोषण केले. तसेच “शेतकरी आत्महत्या थांबवण्याची सुबुध्दी राज्यकर्त्यांना द्या…,” अशी मागणी केली.
कराड तालुक्यातील शिवाजी पाटील, संजय देवकर, रमेश सुर्वे, भगतसिंह महाडीक, पंढरीनाथ माने, अशोक टोळे, सुनील देवकर, विक्रम पाटील व शेतकऱ्यांनी मंगळवारी केलेलया आंदोलनाची चांगलीच चर्चा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली.
राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या असल्याचे मानले जाते. यानंतर गेल्या ३८ वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या स्मृतीदिनी शेतकऱ्यांनी आज अन्नत्याग उपोषण करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करुन सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना शेतकऱ्याप्रती संवेदना ठेवुन आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस धोरण व उपाययोजना राबवण्याची सुबुध्दी देण्याची प्रार्थना केली. राज्यासह संपूर्ण देशातील शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती घोषीत करून युध्द पातळीवर उपाययोजना राबवण्याची तीव्र गरज असल्याचे मत व्यक्त केले.